मेहरुण मधील गोडाऊनला भीषण आग

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील मेहरुण परिसरात असणाऱ्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली असून अग्नीशाम दलाचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

यासंदर्भात वृत असे की शहरातील मेहरुण परिसरात महादेव मंदिराच्या परिसरात असलेल्या गोडाऊनला रात्री ९:३० वाजता भीषण आग लागली. काही मिनिटांच्या आगीचे लोळ उठत असल्यचे पाहुन परिसरातील नागरीकांनी तातडीने अग्नीशामन दलास पाचारण केले. महापालिकेच्या फायर फायटर कर्मचारी घटनास्थळ धाव घेउन आग विझवण्यास प्रारंभ केला.

अग्नीशामन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवण्यास तात्काळ प्रारंभ केला. दरम्यान, या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here