भिवापूर (तालुका क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी समोरुन येणा-या टाटा मँजिक या चार चाकी वाहनाला धडकली. झालेल्या अपघातात दुचाकी चालक मरण पावला तर टाटा मँजिकचा चालक गंभीर जखमी झाला. सदर घटना आज दुपारी बाराच्या सुमारास भिवापूर जवळी मार्गावरील मेढा फाट्याजवळ घडली.
बंडु नारायण राजनहिरे ( ४२ वर्ष ) रा. आलेसुर असे मृतकाचे तर देविदास मारोती थेरे रा. तातोली असे जखमी मँजीक चालकाचे नाव आहे. मृतक बंडु हा दुचाकीने ( क्र. MH 40 CB 4353 ) आलेसुरवरुन धामणगाव, मेढा मार्गे भिवापूरला येत होता. मेढा फाट्यावर भरधाव दुचाकिवरील त्याचे नियंत्रण सुटले व ती भिवापूरवरुन तातोलीच्या दिशेने जात असलेल्या टाटा मँजीक ( क्र. MH 31 CS 2426 ) ला धडकली. यात बंडुच्या डोके व शरीराला गंभीर मार बसला तर मँजीक चालकाच्या हात, पाय व तोंडाला मार लागुन तो जखमी झाला.
अशा अवस्थेतही त्याने गंभीर जखमी झालेल्या बंडुला कसेबसे त्याच्या वाहनात टाकुन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात पोहचण्याआधिच बंडूची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असुन ठानेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात हेड काँन्सटेबल डहाके पुढील तपास करीत आहे.






