खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी बिबवेवाडी पोलिसांकडून जेरबंद

arrested

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : खून करुन फरार झालेल्या आरोपीच्या बिबवेवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील बिबवेवाडी येथे करण्यात आली आहे. वाक्य उर्फ प्रसाद संभाजी आयवळे (वय-२५ रा. बिबवेवाडी ओटा नं.२२५ दत्त मंदिरामागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या गुन्ह्यात पोलीस आरोपीचा शोध घेत होते.


बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाक्या उर्फ प्रसाद आयवळे हा त्याच्या लहान बहिणींना भेटण्यासाठी बिबवेवाडी येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिबवेवाडी येथे सापळा रचला. आरोपी पायी चालत येत असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार लोहमकर पोलीस अंमलदार येवले यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करीत आहेत.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here