मौजमजेसाठी लूटमार करणाऱ्या अभिजित नलावडेसह साथीदारांच्या पोलिसांनीआवळल्या मुसक्या

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सक्रिय झाले आहेत. भोसरीमध्ये मौजमजेसाठी लूटमार करून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या ए एन टोळीचा म्होरक्या अभिजित नलावडे याच्यासह त्याच्या साथीदाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यांनी १७ तारखेला रात्री पिंटूकुमार सहा याची डोक्यात दगड घालून हत्या करून लूट केली होती.



मौजमजेसाठी पैसे मिळवण्यास आरोपी अभिजित नलावडे व त्याचे साथीदार नागरिकांची लूट करत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटूकुमार सहा यांची लूट करण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली. आरोपीनी हत्या करत असलेली सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या सीसीटीव्हीहीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास करत टोळीला जेरबंद करत आरोपींना अटक केली.


दुसरीकडं पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यापोलिस कर्मचाऱ्यांनी बेकायदा गावठी पिस्तुल जप्त केले आहे. वडगांव मावळ येथे पेट्रिलिंग करताना गावठी पिस्तूल विक्रीला घेऊन येणार असल्याची ,माहिती पोलिसाना मिळाली.त्या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी अनिल राघू शिंदे,आणि धर्मेश रवींद्रकुमार जयस्वाल यांना अटक केली आहे. कारवाई दरम्यान दोन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे अशी एक लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here