मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिॲलिटी शो कार्यक्रमातील कलाकार पृथ्विक प्रतापला लुटण्याचा प्रयत्न झाला आहे.पोलिसांना फोन केल्यावर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुटिंग आटोपून घरी जात असताना त्यांच्याोबत रिक्षावाल्यानं लुटण्याचा प्रयत्न केल्याचा थराराक अनुभव फेसबुकवरील पोस्टमधून खुद्द पृथ्विक यांनं शेअर केला आहे. मराठी कलाकार पृथ्वीक प्रताप याच्यासोबत घडलेला लुटीचा घडलेला प्रसंग सांगताना कोणत्या रिक्षात नेमकं हे सगळं घडलं, याचीही माहिती त्यानं दिली आहे. शूटिंग आटोपल्यानंतर घरी परतताना रिक्षावाला अरेरावी करून चुकीच्या रोडने घेऊन जात होता. मात्र पोलिसांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे आपण सुखरूप बचावले असल्याची फेसबुक पोस्ट पृथ्विकनं शेअर केली आहे.
पृथ्विक प्रताप काल शूटिंग संपवून काशीमीरा परिसरातून ठाण्याला जात होता त्यासाठी त्याने रिक्षा पकडली होती. मात्र रिक्षाचालक ठाण्याला जाण्याऐवजी वसईच्या दिशेने जाऊ लागला त्यानंतर दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. पृथ्विकने पोलिसांना फोन करताच तो थांबला आणि भांडू लागला आणि पोलीस आल्याचे बघून पळून गेला. हा सर्व घटनाक्रम पृथ्वीक प्रताप याने फेसबूकवर सांगितलाय. अभिनेता पृथ्वीक प्रताप याने हिंदी फिल्म 83 मध्ये काम केलंय. शिवाय सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून तो घराघरांत पोहोचलाय.







