पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

satej-patil

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : राज्याचे गृहराज्य मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली.त्यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून याबाबत माहिती दिली.


त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

https://www.facebook.com/SatejPatil/posts/468030171360046



दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. तर याआधीही अनेक शासकीय बैठका तसेच विविध विकास कामाच्या उद्धाटनालाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here