नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन येथे आज दिनांक 11 ऑगस्ट 2020
रोजी रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती मा. अभिजीत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी वाडी ग्रामस्थांनी अभिजीत दादा पाटील यांचा सत्कार केला. तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे ही सत्कार ग्रामस्थांकडून करण्यात आला. धनराज पाटील जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार, रवींद्र पाटील उपसभापती पंचायत समिती शहादा, ओरसिंग पटले ,सुरेश गोसावी ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत पाटील ग्रामपंचायत सदस्य ,गोरख पवार ग्रामपंचायत सदस्य, किरसिंग वसावे ग्रामपंचायत सदस्य, कांतीलाल पावरा, मानसिंग पावरा ,रमेश पावरा, ग्रामसेवक हरिश्चंद्र खसावद, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ







