जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातध सोन्याचे व चांदीचे शिक्के व दागिने असा एकुण आढळुन आले आहे. त्यांची अंदाजित रक्कम १९ लाख १७ हजार २८३ रुपये आहे. हा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करुन कासोदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडुन मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कासोदा येथील रहिवाशी ताराबाई गणपती समदानी यांच्या जुन्या व पडक्या घराचे खोदकाम करण्याचे काम गावातील जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (वय- ३२) ट्रैक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (वय- ५०) संजय उर्फ सतीश साहेबराव पाटील (वय- ३५) सर्व रा. बोरगाव ता. धरणगांव ह.मु कासोदा यांना देण्यात आले होते. घराचे खोदकाम सुरु असतांना या चार जणांना खोदकाम करतांना चांदीचे शिक्के आणि सोन्याचे दागिने मिळुन आले.
हे चांदीचे शिक्के सन १९०५ ते १९१९ कलावाधीतील असुन सोन्याचे दागिनेसुध्दा पुरातन काळातील असल्याने ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले त्यांची अंदाजित रक्कम १९ लाख १७ हजार २८३ रुपये किंमतीचे ज्वेलरी दुकानदाराकडुन तपासणी करुण खात्री केली आहे. सर्व दागिने व चांदीचे शिक्के कासोदा पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आले.







