जळगाव (क्राईम रिपोर्टर शाहीद खान) : दीड क्विंटल वजनाची तोफ औरंगाबाद शहरातील कच-यात गुरुवारी आढळुन आली असुन ती सिडको पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. कच-यात आढळलेली तोफ पुरात्व विभागाच्या ताब्यात दिली जाणार आहे.
या तोफेला उचलण्यासाठी दहा ते बारा लोकांचे मनुष्यबळ लागले. चोरट्यांनी पुरतत्व विभागातुन सदर तोफ चोरुन आणली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या तोफेला कुणी खरेदारी घेण्यास तयार झाला नसावा असे देखील म्हटले जात आहे अखेर चोरट्यांनी या तोफेला कचऱ्यात टाकुन पलायन केले असावे परिसरातील भंगार व्यासायीकांची याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.