शिवसेना नेत्याच्या पुत्राचा हॉटेलमध्ये राडा, मॅनेजर-कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

crime
file photo

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : येथे एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाने हॉटेलमध्ये राडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्याचा राग आल्याने, हॉटेल कर्मचा-यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

 

याबाबक समजलेली माहिती अशी की, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष आमले यांच्या मुलाने शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यामुळे आमले यांच्या पुत्राने आठ ते दहा जणांच्या टोळक्याला घेऊन जाऊन हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे.

 

लाठ्या,काठ्या, हॉकी स्टिकने आणि रॉडने हॉटेल कर्मचारी तसेच मॅनेजरला देखील बेदम मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेबाबत शहरातील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here