वेषांतर करुन नाशिक पोलिसांची धडक कारवाई; ८ बांगलादेशींची धरपकड

बांगलादेशींची धरपकड

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून, शहरातल्या वेगवेगळ्या भागातून या बांगलादेशीं नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

शहरातील एका परिसरातील बांधकाम साईटवर ६०० कामगार काम करत होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यात काही बांगलादेशी नागरिक होते. मागील ४-५ दिवसांपासून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेषांतर करून त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर ८ बांगलादेशी नागरिकांना अटक केलीय. अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून बांगलादेशी दाखले मिळून आले आहेत. एक बांगलादेशी नागरिक १२ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आला होता. अटक केलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय कागदपत्रे आढळून आले आहेत. केवळ पैसे कमावण्यासाठी ते भारतात आल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

कमावलेले पैसे कलकत्त्यामधील बँकेतून बांगलादेशला ते पाठवत होते. लेबर कॉन्ट्रॅक्टर मार्फत ते नाशकात आले होते. ATS आणि सुरक्षा यत्रणांना देखील याबाबत कळवण्यात आलं आहे. यांना कुणी आश्रय दिला, कागदपत्रे कुणी तयार करून दिली? याची चौकशी सध्या सुरु आहे. ३ जणांकडे भारतीय आधार कार्ड आणि पॅनकार्ड सापडले आहेत. अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे सापडलेले कागदपत्रे आणि पत्ते नाशिक जिल्ह्यातील नाहीत, अन्य ठिकाणची आहेत. अजून बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. आडगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे, असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here