मनमाडच्या शेंडी डोंगरावरून पडून अहमदनगर येथील २ तरुणांचा जागीच मृत्यू

shendi-dongar-manmad

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मनमाडमध्ये शेंडी डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन तरुणाचा डोंगरावरून घसरून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हे दोन्ही तरुण ट्रेनर होते. या दोघांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडच्या शेंडी डोंगरावर घडली आहे. ट्रॅकिंग करण्यासाठी आलेल्या दोन ट्रेनरचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. अमोल वाघ आणि मयूर म्हस्के अशी या ट्रेनरची नाव असून, हे दोघेही अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर ग्रुपचे ट्रेनर होते. अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रॅकर ग्रुपची १५ जणांची एक टीम मनमाडपासून जवळ असलेल्या कातरवाडी भागातील शेंडीच्या डोंगरावर ट्रॅकिंग करण्यासाठी आली होती. त्यात ८ तरुणी आणि ७ तरुणांचा समावेश होता.

सर्वजण डोंगरावर गेल्यानंतर सुरुवातीला ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के यांनी खिळे ठोकत दोर बांधून डोंगराच्या शेंडीवर गेले त्यानंतर इतर १३ जण वरती चढले होते. सायंकाळी १३ जण खाली सुखरूपपणे खाली उतरले. शेवटी ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के खाली येत असताना एक खिळा निखळला त्यामुळे दोर सटकला आणि पाहता पाहता दोघे जण खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघे खाली पडल्याचे पाहून त्यांच्या सोबत असलेल्यानी आरडाओरडा केला. मात्र, डोंगराची उंची जास्त असल्यामुळे खाली गावात त्यांचा आवाज पोहचू शकला नाही. त्यांनी हातवारे पाहून काही तरी वेगळं घडल्याची जाणीव ग्रामस्थांना झाली आणि संघरत्न संसारे, तुषार बिडगर,अमोल झालटे,प्रवीण संसारे,राजेंद्र गांगुर्डे, संतोष झालटे, तेजस ढोणे, कल्पेश सरोदे, दत्तात्रय झालटे, ऋषी गुंजाळ, किरण झालटे, विजय संसारे,आदी तरुणांनी डोंगरावर गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह खाली आणून ते शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डोळ्या देखत दोघांचा मृत्यू झाल्याचे पाहून ट्रेकिंगसाठी आलेल्याना मोठा धक्का बसला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here