पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून वाहन चोरांचा शोध घेतला जात असताना फरासखाना पोलिसांनी एका सराईत रिक्षा चोरणाऱ्यास अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संतोष उर्फ अशोक चंद्रकांत ढेरे (वय-४६ सध्या रा. चाकण चौक, गोधळे आळी, केळगाव रोड, आळंदी, पुणे मुळ रा. राशींद ता. कर्जत जि. अहमदनगर) या आरोपीने शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ४ रिक्षा जप्त केल्या आहेत. ही कारवाई आळंदी येथील केळगाव रोड येथे केली.
फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. फरासखाना येथे दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आळंदी येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण व अभिनय चौधरी यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरुन तपास पथकाने आळंदी येथील केळगाव रोड येथे आरोपीचा शोध घेतला. आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने फरासखाना, लष्कर आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४ रिक्षा चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी १ लाख ४ हजार रुपये किमतीच्या ४ रिक्षा जप्त केल्या आहेत.
ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, मनोज अभंग, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मेहबुब मोकाशी, मोहन दळवी, रिजवान जिनेडी, वैभव स्वामी, राकेश क्षिरसागर, ऋषीकेश दिघे, विशाल साबळे, महावीर वलटे यांच्या पथकाने केली.







