कबड्डी सामन्यांच्या उद्‌घाटनाला आमदार चंद्रकांत पाटील खेळले कबड्डी

muktainagar-mla-chandrakant-patil-plays-kabbadi

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे मतदार संघातील मौजे उमरा तांडा येथे आ. चषक कबड्डीचे खुल्या सामन्यांच्या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी आले असता त्यांनी कबड्डी खेळून खेळाचा आनंद घेतला.



तरुणांनी मोबाईलच्या या दुनियेत मैदानी खेळांना न विसरता हे खेळ आयुष्याचा भाग करा आणि अशा मैदानी खेळातून तुम्ही स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करू शकाल असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



यावेळी प्रसंगी त्यांच्यासोबत गोपाळ सोनवणे, शिवसेना उपतालुका प्रमुख नवनीत पाटिल, पंकज पांडव, नितीन कांडेलकर, कुर्बान तडवी, दिपक वाघसर, बाळू पाटिल, रशीद भाऊ, संदीप डीवरे, काशिनाथ वानखेडे, ज्ञानेश्वर सोनोने, आरीन तडवी, शिवा पवार, तसेच परीसरातील नागरिक शिवसैनिक तथा पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here