अमरावती येथे चोरट्यांनी एकाच रात्री फोडली ९ दुकानं

amravati-theft

अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : जिल्ह्यातून एका चोरीच्या घटनेची बातमी समोर येत आहे. चोरट्यांनी एका रात्रीत ९ दुकानं फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


या घटनेनं दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात एकाच रात्री ३ गावात ९ दुकानं चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. या दुकानांमधून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री नऊ दुकानाचे शटर तोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे.


या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. चोरटे दुकान फोडत असताना ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here