जळगाव (क्राईम रिपोर्टर शाहिद खान) : मोहाडी येथील नवीन कॉलोनी भागात काल सायंकाळी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १२०० रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हे.कॉ शुध्दोधन ढवळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल पो.हे.कों जितेंद्र राठोड, पोना समाधान हाकळे यांना सपोनि अमोल मोरे यांनी गुप्त बातमीदारामार्फत समजलेली माहिती दिली होती मोहाडी येथे नवीन कॉलनी बाजूला एक आरोपी गावठी दारूची चोरटी विक्री करीत असल्याचे समजल्याने कारवाईची सूचना दिली होती.
या पथकाने मोहाडी येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास छापा टाकला आरोपी जागीच पकडले. सिताराम वामन सपकाळे, ( वय- ५६ रा. नवीन कॉलनी ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातुन १२०० /- रुपये किमतीची २० लि. गावठी दारु व दहा पंच कंपनीच्या दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या . पोलिसांना पंचनामा करुन ही दारु नष्ट केली या आरोपीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







