रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना एलसीबीकडून अटक

three-accused-arrested-at-jalgaon

जळगाव ( क्राईम रिपोर्टर असलम खान) : शहरात रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. मोसिन खान उर्फ शेमड्या नुरखान पठान ( वय-२८ ) शाहरुख शेख रफीक ( वय- २० दोघ रा. पिंप्राळा हुडको, समाधान सुमेरसिंग पाटील, ( वय- ३३ ) रा. खंडेराव नगर अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.


शहरातील तांबापुरा परिसरातील शेख जलील शेख इब्राहिम ( वय- ७२ ) हे धुळे जाण्यासाठी आकाशवाणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले होते. यावेळे आलेल्या एका रिक्षात शेत जलील बसले. या वेळी रिक्षात पूर्वीच बसलेल्या तीन जणांनी शेख जलील यांच्या खिशातील १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदसतीने काढुन घेत त्यांना रसत्यात उतरुन दिले. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी मोहसीन खान, शाहरुख शेख रफिक, समाधान पाटील, या तिघा संशयितांना अटक केली आहे. पुढील कारवाई तिघांना पुढील कारवाईसाठी रामानंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वयोवृध्दाला लुटल्याची घटना घडताच पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले, यांच्या मार्गदर्शनखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, भारत पाटील, यांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here