आकाश समजून बिल्डिंगच्या काचांना धडकून ३४ पक्षांचा मृत्यू ?

surat-nagrik-bank-building

पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी बांधकाम कायद्यात बदल हवा – पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ

सुरत (गुजराथ) : येथे एक इमारत पक्षांच्या जीवावर उठली आहे. तुम्हाला खरं वाटत नाही ना!, पण हे खरं आहे. इमारतीच्या भींतीला काचा लावण्यात आल्या आहेत. याच काचा पक्षांसाठी घातक ठरल्या आहेत. या कांचावर धडक बसून जवळपास ३४ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.



सांगितले जात आहे की, इमारतीवर लावण्यात आलेल्या काचांमुळे आकाशाचे रिफ्लेक्शन पडलेले दिसत आहे. हे आकाश समजून पक्षी उडत असताना त्याकडे आकर्षित झाले ते काचांवर धडकलेत. त्यानंतर पक्षी जमिनीवर खाली पडले. या दुर्घटनेत जवळपास ३४ पक्षी जखमी होऊन मृत्यू पावलेत.



सूरत नागरिक बँकेच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये ३४ पक्षी एकाच वेळी वरुन पडताना दिसत आहेत. असे मानले जाते की इमारतीवर काचा होत्या, ज्यामध्ये आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते.आकाशाचा विचार करता, पक्षी वेगाने काचेवर धडकले असतील, असे सांगितले जात आहे.



या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने नव्या बांधकामास परवानगी देतांना घरांना ३० फूट उंची वरील घरांना काचा लावण्यास परवानगी देऊ नये व याबत योग्य तो कायदा करावा व त्याची अंमलबजावणी करावी,तसेच आज ज्या इमारतींना काचा आहेत त्यांना त्वरीत काचा काढण्याचा आदेश काढावा अशी मागणी जळगाव येथील पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here