जळगाव (निलेश पाटील) – शहरासह हायवेवर अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहेत फोरलेन, पर्यायी रस्ते यांची कामे एकाचवेळी सुरु केल्याने, मात्र रस्त्यांची दुरावस्ता झाली आहे. त्यातच दादावाडी समोरील रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांचे फारच हाल होत आहे. खड्डे, चिखल, पाणी मय असलेल्या या रस्त्यावर एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याने, हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे.
नवीन रस्ता तयार करताना प्रवाशांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करूनच कामाला सुरुवात करावी लागते परंतु चौपदरी रस्त्याचे व जळगाव शहरातील बायपासचे काम सुरू असताना पालकमंत्र्यांनी दणका दिल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ मागच्या वर्षी हाच रस्ता अवघ्या दोन दिवसात तयार केला होता. परंतु तोच रस्त्याच्या पुन्हा आता काम सुरू असल्यामुळे इतका खराब झाला आहे की त्यावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे झाले आहे इतके मोठे,मोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत दिवसा समोरील येणारे व जाणारे वाहन दिसता त्याप्रमाणे खड्डेसुद्धा दुरून दिसतात परंतु रात्रीच्या वेळेस प्रवास करताना काही अनुचित प्रकार घडून एखादया प्रवाशांना जीवगमवावा लागणार याला जबाबदार कोण असेल. त्यामुळे संबंधित विभागाने दखल घेऊन दोन दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरु न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. पी एम पाटील यांनी दिला आहे.







