फैजपूर (डॉ.मोहन साळुंके) – येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील एनसीसी युनिटच्या वतीने आत्मनिर्भर भारत अभियानात भारत सरकार प्रोत्साहित दि 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान आत्मनिर्भर भारत अभियानात एनसीसी कॅडेटस व एनसीसी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
डी जी, एनसीसी, दिल्ली यांच्या आदेशान्वये 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशिल बाबर व धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील एनसीसी युनिटचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत व त्यांच्यासमवेत 65 एनसीसी कॅडेटसने या अभियानात विविध उपक्रमातून सक्रियपणे सहभाग नोंदविला. कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत अभियानासाठी केंद्र सरकार तर्फे उचललेल्या स्तुत्य योजनांची माहिती सोशल मीडिया जसे फेसबूक, व्हॉट्सऍप, ट्विटर, इंस्टाग्राम आदी माध्यमांचा वापर करून व्हिडिओच्या माध्यमातून जनमानसात पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यासोबत कविता, चित्रे, आणि ब्लॉग यांचा कौशल्य पूर्ण वापर करून ‘व्होकल अबाउट लोकल’ यावर उत्कृष्टपणे सादरीकरणे केली. यात केंद्र सरकार पुरस्कृत माय गव्हर्नमेंट अँप मधील व्होकल अबाउट लोकल ही प्रतिज्ञा घेऊन यापुढे प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगांव चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशिल बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार, सुभेदार मेजर कोमलसिंग, तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरिषदादा चौधरी, आमदार, रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा डॉ एस के चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंद वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत सर्व सन्माननीय प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व कॅडेटसने मार्गदर्शन आणि परिश्रम घेतले.







