भारतपूर (राजस्थान) : येथील एक महाविद्यालयीन युवती आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या शिक्षकाच्या प्रेमात पडली आणि तिनं घरातून पळून जाऊन शिक्षिकेशी कोर्टात लग्न केलं आहे. २२ वर्षीय विद्यार्थिनी आपल्या ४२ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली आणि दोघांनीही घरातून पळून जाऊन लग्न केलं. शिक्षक आणि विद्यार्थीनीनं पळून जाऊन केलं लग्न ४२ वर्षीय शिक्षिकेकडून ट्यूशन शिकत असताना विद्यार्थिनीचं त्यांच्यावर कधी प्रेम झालं समजलंच नाही. दोघेही सोबत पळून गेले आणि नंतर अजमेर कोर्टात जाऊन लग्न केलं. बुधवारी संध्याकाळी दोघेही भरतपूर एसडीएम कार्यालयात पोहोचले.
तेथे दोघांचे जबाब नोंदवण्यात आला. त्यात तरुणीने पतीसोबत जाण्यास होकार दिला. मुलीच्या घरच्यांनी तिला त्यांच्यासोबत जाण्यासाठी खूप विनवणी केली पण मुलीनं नकार दिला आणि ती तिच्या शिक्षक पतीसोबत गेली. शिक्षक विद्यार्थीनीच्या घरी शिकवणीसाठी जात असत मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय सतवीर भरतपूरच्या डीग पोलीस स्टेशन हद्दीतील जनुठार गावातील सरस्वती आयटीआय कॉलेजमध्ये शिकवत होता.
सतवीर हा इंग्रजीचा शिक्षक आहे. सतवीर हा २२ वर्षीय सोनियाच्या घरी तिला इंग्रजी शिकवण्यासाठी जात असे, तिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सुमारे वर्षभरापूर्वी सतवीरनं महाविद्यालयात शिकवणं बंद केले. त्यानंतर तो सोनियाच्या घरी तिला शिकवण्यासाठी जात असे आणि याच दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
बऱ्याच दिवसांनी सोनिया ही मुलगी भरतपूरला मावशीकडे राहण्यासाठी आली. इकडे आल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि जानेवारी महिन्यात सतवीर तरुणी सोनियाला घेऊन अजमेरला गेला, तिथे दोघांनी पुष्करमध्ये लग्न केले. सोनिया जानेवारी महिन्यात भरतपूरच्या हाट कॉलनीत तिच्या मावशीच्या घरी आली होती आणि इथे राहत होती. दोघांनी २१ जानेवारीला पळून जाऊन कोर्टात लग्न केलं.
बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या काकांनी मथुरा गेट पोलीस ठाण्यात सोनिया बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे, सोनिया बुधवारी एसडीएम देवेंद्र परमार यांच्यासमोर हजर राहून निवेदन देत पती सतवीरसोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पोलिसांनी सोनियाला तिच्या पतीसोबत पाठवलं. घरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण.. कुटुंबीयांनी मुलगी सोनियाचा खूप शोध घेतला, मात्र तिचा पत्ता लागला नाही.
यानंतर सोनियाच्या नातेवाईकांनी मथुरा गेट पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. मथुरा गेट पोलीस स्टेशनने मुलगी सोनिया आणि शिक्षक सतवीर यांना भरतपूर एसडीएमसमोर हजर केले. जिथे दोघांनी पोलिसांसमोर जबानी दिली आणि सांगितले की दोघांनी स्वतःच्या इच्छेनं लग्न केले आहे आणि दोघांनाही एकमेकांसोबत राहायचे आहे. कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी एसडीएम कार्यालय गाठले. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी सोनियाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मान्य झाली नाही. तिचे भावी आयुष्य सतवीरसोबत घालवायचे असल्याचे तिने सांगितले. सध्या मुलगी सतवीरसोबत गेल्याचे सांगण्यात येत आहे.







