पुणे (क्राइम रिपोर्टर शंकर शंकपाळ) : रस्ता क्रॉस करत असताना. मुलगा स्पीडमध्ये होता. टू व्हीलर म्हणजे बुलेट रस्त्यावरून धावत असताना मुलाला धडक दिली व मुलगा डिव्हायडरला धडकून खाली पडून बेशुद्ध पडला.
प्रत्यक्ष घटनास्थळी जमा झालेले लोक केवळ त्या मुलाकडे बघत असताना शंकर संकपाळ या मुलाच्या मदतीला धावून आले व मुलाला उचलून त्या दूचाकीचालकासोबत बोलून त्याला मिशन हॉस्पिटल येथे ॲडमिट केले.
आता मुलाची प्रकृती व्यवस्थित आहे. मुलाच्या डोक्यात दोन टाके पडले असून, कमरेला मुका मार तसेच हाताला थोडेसे लागलेले आहे. त्याचा सिटीस्कॅन वगैरे करण्यात आला असून, शंकर संकपाळ यांनी प्रसंगावधान दाखवून लगेच दवाखान्यात आणल्यामुळें अनर्थ टळला आहे.







