चार वर्षांच्या मुलीला दूचाकीवरून पळवून नेत केला अत्याचार

मिरज (तालुका प्रतिनिधी संजय माळी) : सातारा शहरातून एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून पळवून नेऊन अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने, सातारा शहरातून एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपल्या दुचाकीवरून नेले. यानंतर तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडून तो पसार झाला. संबधित मुलगी जखमी झाली आहे.

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here