
कसमादे मध्ये संघटनेचा यशस्वी दौरा संपन्न
नाशिक (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या व्यथा समजुन घेण्या साठी ,कसमादे मध्ये अजुन उत्पादनाच्या ७०टक्के कांदा अजुनही चाळी मध्ये पडुन आहे ,उशिरा काढलेला कांदा हवामान बदलामुळे चाळीतच सडत असल्यामुळे घट ३० ते ३०टक्के घट होत आहे , त्यामुळे शेतकऱ्यानी मोठ्या अपेक्षेने साठवलेला कांदा सध्या बाजारात ५०० ते ६०० रूपाने विकला जातो आहे, एक.क्किंटल कांदा टिकवायला १००० ते १२०० रुपये खर्च येत असताना शेतकऱ्याना
फक्त ५०० ते ६०० रुपये दराने विकण्याची पाळी आली असून ही शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे ,या गंभीर समस्येबाबत केंद्र व राज्य दोघेही उदासिनता दाखवत एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकार दोनच मिळुन कांदा उत्पादकांना आंर्थिक दिलासा देण्यासाठी पुढे आले पाहिजे व किमान ५०० कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दीघोळे यांनी याप्रसंगी उपस्थित कांदा उत्पादकासमोर बोलताना सांगितले.
कांदा उत्पादक संघटनेचे प्रवक्ते शैलंद्र पाटील यांनी सांगितले की दिवसेंदिवस पिकवायला कांदा खराब होते आहे ,असा खराब व सडलेला कांदा सरकारने खरेदी करावा नाहीतर त्यासाठी किमान १५ कोटी रुपये नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी केली. कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी कळवण ,सटाणा येथील बाजार समिती आवारात कांदा उत्पादक व व्यापाऱ्याशी संवाद साधताना म्हटले की , महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून कांदा उत्पादकांच्या रास्त मागण्यांबाबत संघटनेचे आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे विविध बाजार समितीमध्ये आज किमान भावात १५० ते २०० रुपयांचा फरक पडलेला आहे ,ही बाब नक्कीच सकारात्मक आहे त्यासाठी व्यापाऱ्यांनी ही साथ दिली पाहिजे, राज्य व केंद्र सरकारने संयुक्तपणे कांदा उत्पादकांच्या रास्त मागण्या मान्य करून किमान ७०० ते ८०० रुपये अनुदान जाहीर करून न्याय द्यावा. अन्यथा भविष्यात कांदा उत्पादक संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करून या जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या दालनात कांदे टाकुन निषेध नोंदवला जाईल, असे जाहीर आवाहन संघटनेचे अध्यक्ष भारत दीघोळे यांनी यावेळी उपस्थित कांदा उत्पादकांसमोर केले. ११ ऑगष्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांना व कांदा उत्पादकांना भेटुन चर्चा केली , यावेळी वणी ,अभोणा ,कळवण ,देवळा ,सटाणा ,नागपुर , उमराणे ,उभ्याने , मुंगसे येथे जाऊन प्रत्यक्षात बाजारभाव व विक्री व्यवस्थेची पाहणी करून समस्या जाणुन घेतल्या. कांदा उत्पादक संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या संपर्क दौऱ्यात संघटनेचे अध्यक्ष भारत दीघोळे, प्रवक्ते शैलंद्र पाटील, संपर्क प्रमुख कुबेर जाधव, संघटक कृष्णा जाधव , जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, सरचिटणीस दश्यांत पवार, विलास रौदळ , व्यंगचित्रकार किरण मोरे, ओंकार पाटील, बाळासाहेब शेवाळे , शामकांत पवार , भगवान जाधव ,बापु देवरे , भाऊसाहेब मोरे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुभाष आहीरे ,हेंमत बिरारी ,अभिमन पगार ,शेखर कापडनीस ,दशरथ पुरस्कार आदी पदाधिकारी व शेंकडो कांदा उत्पादक उपस्थित होते.






