आडगाव येथील लाचखोर पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : आडगाव येथील लाचखोर पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेक बाऊन्सचे प्रकरण मिटवून देण्यासाठी, तसेच तक्रारदार यांचे विरूद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार न नोंदविण्यासाठी २० हजाराची मागणी केल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

आडगाव पोलिस स्टेशनमधील राजेश हरी थेटे (वय ५३) असे लाच मागणाऱ्या हवालदाराचे नाव आहे. २५ एप्रिल रोजी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करून रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here