चेतनानगरात चोरट्यांनी केला सव्वा लाखाचा ऐवज लंपास

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील चेतनानगर भागात चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला.यात १५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.

संजय रामनाथ वैद्य (रा.श्रीनाथजी रो हाऊस,सेंट फ्रान्सिस स्कूल जवळ) यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वैद्य कुटूंबिय ७ ते १६ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे १ लाख १५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here