जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : पारोळा तालुक्यातील करंजी येथे राहणारे अरुण साहेबराव पाटील यांचा मोटारसायकलवरुन जातांना ट्रकच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे.
अरुण साहेबराव पाटील आपल्या मोटारसायकलवरून पारोळा येथून करंजी येथे जात असतांना त्यांना भरधाव जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.एच.४३ बीपी ८५७८) धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.








