वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली पोलीस कर्मचारी व सस्पेंड पोलिसांच्या आशिर्वादाने ठाणे जिल्ह्यात मिळत आहे अवैध धंद्यांना पाठबळ

thane-police-commisoner-office

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे आयुक्तालयाच्या अंतर्गत शहर व ग्रामीण परिसरासह पनवेल, नवीमुंबई या भागात अवैध धंद्याला ऊत आला आहे. ठिकठिकाणी मटका व पत्त्यांचे अड्डे हे राजरोसपणे सुरु आहेत. काही मटका व पत्ते अड्डे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली काही पोलीस कर्मचारी व सस्पेंड पोलिसांच्या आशिर्वादाने सुरू असल्याचे समजत असून, कारवाईबाबत पोलीस प्रशासन मात्र ढीम्म आहे. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेबद्दल जनसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.

ग्रामीण भागात मटका व्यवसायाने तसेच तेलभेसळ, हुक्का पार्लर, स्पा, पब यांनी आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. या धंद्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाव वापरुन सस्पेंड अधिकारी पाठिंबा देत असल्याने, स्थानिक पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. हे चित्र कधी बदलणार याविषयी उलट सुलट चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

गल्लीबोळात मटका अड्डे सुरु आहेत, अवैध धंदे चालवणाऱ्यांना नक्की कोणाच पाठबळ आहे याविषयी नागरिकांमध्ये चर्चा आहे, काही मटका अड्डे तर पोलिस ठाण्यांच्या अवघ्या काही अंतरावरच चालतात पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई मात्र होताना दिसत नाही, पण ह्या अवैध धंद्यांमुळे अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत त्यामुळे या गोष्टींकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिले तर अनेकांचे संसार उध्वस्त होणे थांबेल अशी देखील चर्चादेखील परिसरात होत असून, या अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here