जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : आदिशक्ति मुक्ताबाई यांचा सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वे) वर्ष अंतर्धान सोहळा आज दि.२५ मे रोजी वैद्याख वद्य दशमी मुहूर्तावर असल्याने संत नगरी कोथळी मुक्ताईनगर येथे पंढरीश परमात्मा, रुख्मिणी माता, नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ , संत सोपान काका व लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
या सोहळ्याच्या अनुषंगाने अनेक मुक्ताईनगर नागरिक, युवक, महीला भगिनी यांनी आपल्या व्हॉटस् अप , फेसबुक , इंस्टा , ट्विटर अशा सोशल मिडीयावर स्टेटस वा पोस्ट करत मुक्ताई अंतर्धान सोहळा सर्वत्र व्हायरल झालेला दिसून येत आहे. मुक्ताईनगर येथील युवक गणेश लाहोटी यांनी ट्विटर अकाऊंटवर संत मुक्ताई अंतर्धान सोहळा अभिवादनाची पोस्ट ट्विट केलेली होती.
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 25, 2022
गणेश लाहोटी यांनी ट्विटर अकाऊंट वर ट्विट केलेली पोस्ट बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अकाऊंटवर रिट्विट करून आदिशक्ति मुक्ताई यांना अभिवादन केले असून या सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी व भाविकांना या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.







