दोन महिन्यांपासून फरार असलेला खूनाच्या आरोपीस जिल्हापेठ पोलिसांनी केले जेरबंद

jillha-peth-arrest-murderer

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : गेल्या दोन महिन्यांपासून खूनाच्या आरोपात फरार असलेल्या आरोपीस जिल्हापेठ पोलिसांनी कालंकामाता परिसरातून जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस सीआर २२४/२०२२ भा.दं.वि ३०२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी पवन उर्फ बड्ड्या दिलीप बाविस्कर हा शहरातील कालंकामाता मंदीर परिसरात असल्याची माहीती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोहेकाँ /2534 सलीम तडवी व पोकाँ/ 936 रविन्द्र साबळे यांना मिळाली

या माहितीची तात्काळ दखल घेत त्यांनी सदरची माहिती पोलीस ऩिरीक्षक अरुण धनवडे यांना कळवून गुन्हे शोध पथकातील पोहेकाँ/1463 महेन्द्र पाटील , पोना/2963 गणेश पाटील , पोकाँ/1048 विकास पहुरकर व पोहेकाँ / सलीम तडवी व पोकाँ/ रविन्द्र साबऴे अशांना सदर आरोपीचा शोध घेणेकामी रवाना होणेबाबत आदेश केले.

सदर पथकाने पवन उर्फ बड्ड्या दिलीप बाविस्कर (वय २१, रा तुकारामवाडी, जळगांव) यास कालंकामाता मंदीर परिसरातून ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याबाबत अधिक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चन्द्रकांत गवळी, सहा.पोलीस अधिक्षक कुमार चितां यांनी केलेल्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथक यांनी कामगिरी केली असून पुढील तपास सहा.पोलीस.निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here