रामेश्वर कॉलनी हाणामारी प्रकरण : आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी

rameshwar-colony-accussed

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरातील रामेश्वर कॉलनी स्वामी समर्थ चौकात हाणामारी करणाऱ्या सहा आरोपींना आज (दि.२५) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना उद्या (दि.२६) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १५ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात रामेश्वर कॉलनी स्वामी समर्थ चौकात फिर्यादी गं.ह.भा. अंजनाबाई नारायण पाटील, (वय ५० वर्षे), यांचे घरासमोर सुरज कुमवात नावाचा इसम हा अंडापाव ची गाडी लावतो. व सदर गाडीवर लोक दारु पिवुन येतात व मोठमोठयाने आरडाओरड करुन शिवीगाळ करतात, सदर बाबतीत फिर्यादी अंजनाबाई पाटील, त्यांचा मुलगा हेमंत पाटील, यशवंत पाटील हे समजवण्यास गेले असता त्याचा राग येवुन सुरज कुमावत, मनोज निंबाळकर, आबा केने, धिरज केने, केतन सोनवणे, निलेश निंबाळकर अशांनी फिर्यादी यांचे घरात अनाधिकारे प्रवेश करुन फिर्यादीची मुलांना चापटा बुक्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर दिनांक 24/5/2022 रोजी सकाळी 09:30 ते 10:00 वाजेच्या सुमारास सुरज कुमावत याचे अंडापाव च्या गाडीला लावलेली ग्रिन नेट कोणतरी अज्ञात इसमाने फाडुन नुकसान केले होते. सदरची नेट ही फिर्यादीच्या मुलांनीच फाडली असा संशय मनात ठेवत सुरज कुमावत व त्याच्या वरील साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीस शिवीगाळ करुन फिर्यादीची मुले नामे यशवंत पाटील व हेमंत पाटील अशांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन, शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणुन फिर्यादी ग.ह.भा. अंजनाबाई नारायण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी नामे 1) धिरज अशोक केने, वय 28 वर्ष, रा. पुर्वा मेडीकल जवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, 2) केतन जगदीश सोनवणे, वय 23 वर्ष, रा. श्रीराम कन्या शाळेजवळ, लक्ष्मी नगर, जळगाव, 3) विजेंद्र अशोक केने, वय 30 वर्ष, रा. पुर्वा मेडीकल जवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, 4) मनोज प्रभाकर निंबाळकर, वय 34 वर्ष, रा. हरेश नगर, आदीत्य हॉटेल चौक, रामेश्वर कॉलनी, जळगाव, 5) सुरज संजय कुमावत, वय 28 वर्ष, रा. राज शाळेजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, 6) निलेश प्रभाकर निंबाळकर, वय 27 वर्ष, रा. हरेश नगर, आदीत्य हॉटेल चौक, रामेश्वर कॉलनी, जळगाव यांना अटक दिनांक 24/05/2022 रोजी अटक करण्यात आली असून त्यांना आज दिनांक 25/05/2022 रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अटक आरोपीतांची दिनांक 26/05/2022 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांचे मार्गदर्शनाखली पो.उप.निरी. दिपक जगदाळे, स.फौ. आनंदसिंग पाटील, पो.ना. दत्तु बडगुजर, फोम OTIN SARAMD, सचिन पाटील. गोविंदा पाटील अशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here