टीईटी घोटाळा प्रकरणात जळगावातील वकिलाला अटक

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) : राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात पुणे पोलीस जळगावात आहे. पोलिसांनी गोलाणी मार्केटमधील बालाजी जॉब प्लेसमेंटच्या कार्यालयात झाडाझडती घेतली. तसेच या संस्थेचे संचालक अ‍ॅड. विजय दर्जी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील गोलाणी मार्केटमध्ये असलेल्या बालाजी जॉब प्लेसमेंट या संस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. आता पर्यंत बऱ्याच बेरोजगारांना ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक झाली आहे. तसेच राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यात पोहोचल्यानंतर जळगावचे नाव पुन्हा राज्यभर गाजले होते. त्यावेळी सर्वात अगोदर चाळीसगाव मधून काही जणांना अटक करण्यात आली होती.

आता जळगावातील बालाजी जॉब प्लेसमेंटचे अ‍ॅड. विजय दर्जी यांच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. आतापर्यंतच्या तपासात अ‍ॅड. विजय दर्जी यांचे मोबाईल कॉल डिटेल्स, ऑनलाइन व्यवहार, मेल यासह इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दर्जी यांचे नाव या प्रकरणात समोर आले होते. त्याच्या आधारावर त्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीत काय निष्पन्न होते, त्यानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती भाग्यश्री नवटके यांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here