ग्राहकांसाठी नवजीवन प्लसमध्ये उपलब्ध आहे खास दालचिनीचे झाड

special-cinnamon-tree-is-available-in-Navjeevan-Plus

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरात सातत्याने नावीन्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या नवजीवन प्लसच्या बहिणाबाई गार्डन स्टोअरमध्ये ग्राहकांना नैसर्गिक तत्व असणारी दालचिनी उपलब्ध होण्यासाठी खास दालचिनीचे झाड उपलब्ध आहे. यातून ग्राहकाच्या मागणीप्रमाणे दालचिनी काढून देण्यात येणार आहे.
जगातील सर्वात जुन्या शक्तीशाली मसाल्यांपैकी एक म्हणून, दालचिनीचा उपयोग त्याच्या उपचार गुणधर्मांसाठी अनेक प्रकारच्या समग्र आणि पारंपारिक औषधांमध्ये मुख्य म्हणून केला जातो. दालचिनीच्या व्यापक फायद्यांमुळे अनेक संस्कृतींमध्ये आजही त्याचा वापर केला जातो, त्याच्या विशिष्ट गोड, उबदार चवीमुळे मसाला म्हणून त्याचा मिठाईपासून ते पेय पदार्थांपर्यंतच्या विविध प्रकारच्या पाककृतींमध्ये वापर केला जातो.
नैसर्गिक व शुध्द दालचिनी ही विविध प्रकारच्या ॲण्टीऑक्सिडंटस्‌ने युक्त असते. नवजीवन प्लसच्या बहिणाबाई गार्डन स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक दालचिनीसोबतच मसाला विभागात नवजीवन तयार लोणचे मसाला, नवजीवनचे गुणवत्तापूर्ण तिखट, हळद, गरम मसाला, शेवभाजी मसाला, खिचडी मसाला उपलब्ध असल्याचे नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरिया यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here