जम्मू-काश्मीर : अवंतीपुरा सोरामधील चकमकीत एकूण ४ दहशतवाद्यांचा खात्मा

awantipura-sora
File Photo

जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : काल रात्री काश्मीर खोऱ्यात २ ठिकाणी चकमकी झाल्या. श्रीनगरच्या सोरामध्ये एलईटीचे २ दहशतवादी ठार करण्यात आले. त्यांच्याकडून १ एके-४७ आणि एक पिस्तूल मिळाले. अवंतीपोरा चकमकीत, टीव्ही कलाकार अमरीन भटच्या हत्येप्रकरणी एलईटीचे २ दहशतवादी मारले गेले. एकूण १० दहशतवादी गेल्या तीन दिवसांत मारले गेले. त्यामध्ये ७ एलईटीचे तर ३ जैशचे होते अशी माहिती विजय कुमार, आयजीपी काश्मीर यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील हांजीपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या संदर्भात आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकासोबत झालेल्या चकमकीत दोन ते तीन दहशतवादी अडकले होते. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. आयजीपीच्या म्हणण्यानुसार, चकमकीत सहभागी दहशतवाद्यांचा टीव्ही अभिनेत्री अमरीन भटच्या हत्येत सहभाग होता. या दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एक दिवस आधी बुधवारी रात्री उशिरा टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दहशतवाद्यांनी अमरीन यांच्या १० वर्षांच्या पुतण्यालाही गोळ्या घातल्या. मात्र, तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलाची गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर मुलगी जखमी झाली. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here