इंद्रायणी नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू

Car-crash-in-river-kills-one

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : मावळ तालुक्यातील इंदोरी गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीत एक चार चाकी पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि २७ )रात्रीच्या सुमारास घडली.कार मधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावरील इंदोरी गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून नदीपात्रात कोसळल्याने कारमधील व्यक्तिचा मुयू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

नदीपात्रातून कार बाहेर काढण्याचे काम सुरू असून मयत व्यक्तीचे ओळख अद्याप पटली नाही, याप्रकरणी अधिक तपास तळेगाव एमआयडिसी पोलीस करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here