गुजराथमध्ये मिठाच्या नावाखाली करण्यात येत होती अंमली पदार्थांची आयात

Drugs-were-being-imported-under-the-name-of-salt

अहमदाबाद : गुजरातमध्ये अंमली पदार्थांच्या मोठा साठा जप्त करण्याची कारवाई सुरुच आहे. कोट्यवधी रुपयांचं कोकेन गुजरातमध्ये जप्त करण्यात आलं आहे. तब्बल ५०० कोटी रुपयांच्या कोकेनवर गुजरातच्या बंदरावरुन हस्तगत करण्यात आलं आहे.

डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे. ५२ किलो इतक्या मोठ्या प्रमाणात आयात केलेलं हे कोकेन इराणमधून आणलं गेलं होतं.

धक्कादायक बाब म्हणजे चक्क मिठाच्या नावाखाली कोकेनची आयात करण्यात आल्याचंही उघड झालंय. जप्त करण्यात आलेल्या कोकेनबाबत डीआरआयनं सखोल माहिती दिली आहे. २४ ते २६ मे या काळात ही कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here