बाळापुर येथील अवैध धंदे बंद करा; ग्रामपंचायतचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

illgual-work
FILE PHOTO

सिल्लोड (प्रतिनिधी संजय दांडगे) : तालुक्यातील बाळापुर येथे अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस अधीक्षक औरंगाबाद यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

बाळापुर गावात अलीकडील काळात अवैध धंद्यानी जोर धरला आहे. येथील बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणीही राजरोसपणे हे व्यवसाय सुरु असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध धंद्यात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात गुरफटला जात आहे. तसेच शाळकरी मुलेही याकडे आकर्षित होवू लागल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तरुण वर्ग कर्जबाजारी तसेच व्यसनाधीन होत असल्याने ग्रामस्थामध्ये प्रचंड चीड दिसून येत आहे. पोलीस खात्याचा या व्यावसायिकांवर धाक राहिला नसल्याचे दिसते. गावममध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकते. गावातील महिलावर्गातून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात होती. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थामधून स्वागत केले जात आहे.गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस खात्याने कडक कारवाई करून अवैध व्यवसायाला आळा घालावा.

 

balapur daru

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here