गोवा-हैदराबाद ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; ७ ठार १३ जखमी

Tragic-accident-to-Goa-Hyderabad-Travels

पणजी (प्रतिनिधी) : गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या बसचा कर्नाटकात भीषण अपघात झाला आहे, या अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले असून तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

कर्नाटकच्या कुलबर्गी परिसरात हा अपघात घडला आहे. गोव्याहून हैदराबादला जाणारी ट्रॅव्हल्स मिनी बसला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. धडकेनंतर ट्रॅव्हल्सच्या गाडीला आग लागल्याने मृतांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते आहे. घटनास्थळी कर्नाटक पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. यातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या भीषण अपघाताने तोपर्यंत सात लोकांचा जीव घेतला होता.

बस एका टेम्पो ट्रॅव्हलरला धडकली आणि स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती पुलावरून पडली, त्यानंतर बसला आग लागली. या दुर्दैवी घटनेने सात प्रवाशांचा जीव घेतला. किमान १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये चालक आणि दोन क्लिनरसह एकूण ३५ लोक होते.

स्थानिकांच्या सांगण्यानुसार अपघातानंतर खासगी बसला आग लागल्याने अनेक प्रवाशांची मोठी पळापळ झाली. मालवाहू टेम्पोच्या चालकासह अनेक प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर आता कलबुर्गी येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here