दारुच्या नशेत रिक्षाचालकावर लोखंडी पट्टीने वार; एकास अटक

जळगाव (क्राइम रिपोर्टर अस्लम शेख) : दारुच्या नशेत रिक्षा चालकाला लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत करुन रिक्षावर दगड फेकून नुकसान केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

शहातील समता नगरात संतोष सुर्यभान चौधरी (वय ४२) आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार दि. २ जून रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास संतोष चौधरी हे घरी असताना त्याच भागात राहणारा आकाश केशव पवार याने दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसताना बेदम मारहाण केली. तर हातातील लोखंडी पट्टीने वार करून जखमी केले.

तसेच संतोष चौधरी यांची रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ४८८२) हिच्यावर दगड फेकून नुकसान केले. याप्रकरणी संतोष चौधरी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश पवार याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here