मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटी वसुलीचा ‘लेटरबॉम्ब’ टाकल्यानंतर अटक करण्यात आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुरुवारी ५९ पानांचे आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणातील अन्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मुंबईच्या विशेष न्यायालयात माफीचा साक्षीदार करण्यासाठी केलेल्या अर्जानंतर ही घडामोड घडली आहे.
सीबीआयने स्पेशल कोर्टात अनिल देशमुख, त्यांचे सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन कायदा व फौजदारी स्वरूपाचे कटकारस्थान या कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.






