नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारिकेची आत्महत्या

sheetal-sarode-sucide

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधि-परिचारिकेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. शीतल अरविंद सरोदे (वय ३८, रा. तारवालानगर) असे या परिचारिकेचे नाव आहे.

शीतल यांनी गुरुवारी (दि.२) दुपारी ३.३० च्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांच्या भावाने शीतल यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शीतल यांची सुमारे वर्षभरापूर्वी मालेगाव येथे बदली झाली होती. मात्र, त्या हजर झाल्या नव्हत्या. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here