जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : कासमवाडी परिसरातील मोकळ्या जागी एका तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले. तपासाअंती हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सागर वासुदेव पाटील असल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत सागर पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे देखील समजते.
ईश्वर कॉलनी परिसरात राहणारा सागर वासुदेव पाटील हा मध्यरात्री कुणाच्या तरी निरोपावरुन घरातून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. सागर यास मद्यपानाची सवय होती. आज भल्या पहाटे त्याची दगडाने मारहाण करत हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली.
सदर खून झाल्याबाबत ची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यावर सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद सुधीर साळवे, किशोर पाटील, गोविंदा पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील असे रवाना झाले होते सदर मयताचे प्रेत पाहून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार व यापूर्वी मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपी सागर वासुदेव पाटील असल्याचे निष्पन्न केले होते
सदर ठिकाणी लागली पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार चिंता यांनी भेट दिली होती. अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी व त्याबाबतची माहिती काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे एमायडीसी गुन्हे शोध पथकाने या आरोपीबाबत माहिती काढली होती व त्यांची नावे निष्पन्न केली होती सदरचा गुन्हा हा आरिफ आयुब शहा व जुबेर शेख यांनी केले असल्याबाबतची माहिती मिळाल्याने त्यांचे शोधार्थ एमायडीसी पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे पथक अमळनेर येथे रवाना झाले होते तेथे सदरचे आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखा पथक जळगाव यांना मिळाले होते त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.







