फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्लाचा घरात संशयास्पद मृत्यू

fashion-designer-prathyusha-garimella-found-dead

हैदराबाद : भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्ला हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.प्रत्युक्षा हिच्या तेलंगणा येथील राहत्या घरात मृतदेह पोलिसांना आढळून आला.

याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार प्रत्युषाचा तेलंगणातील बंजारा हिल्स येथील तिच्या राहत्या घरात मृतदेह सापडला आहे. पोलिसांना तिच्या बेडरूम मध्ये कार्बन मोनॉक्साईड सिलेंडरदेखील सापडला असून पोलिसांनी जप्त केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युक्षा गरिमेल्ला घरात असताना तिच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी कामानिमित्त दरवाजाची बेल वाजवली. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बराचवेळ बेल वाजवली मात्र तिने दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या घराचा मुख्य दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. पोलिसांना घरात तपास केला असता तिथे प्रत्युषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here