नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : अवैध दारू विक्रीच्या वादातून निलडोह भागात एका तरुणाचा खून झाला आहे.
हिंगणाच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत निलडोह या गावात एका २२ वर्षीय तरुणाची त्याच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना रात्री उशिरा जुना निलडोहच्या मागच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ घडली आहे.
या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.






