पुण्यात तलवारीस धार न लावून दिल्याने एकावर वार

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : शहरातील येरवड्यातील सुभाषनगर भागात तलवारीस धार लावून न दिल्याने टोळक्याने एकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी हरजीतसिंग (रा. पोते वस्ती, येरवडा) याच्यासह तीन ते चार जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात शाकिब मलिक (वय २४, रा. येरवडा) जखमी झाला आहे. आरोपी हरजीतसिंग आणि मलीक ओळखीचे आहेत. येरवडा भागात सुभाषनगर परिसरातील एका फॅब्रिकेशन व्यावसायिकाकडे मलिक कामाला आहे. हरजीतसिंग आणि साथीदार मलिक याच्याकडे आले.

तलवारी आणि चाकूला धार लावायची असल्याचे त्यांनी सांगितले. मलिकने धार लावण्यास नकार दिल्याने हरजीतसिंग आणि साथीदार चिडले आणि त्यांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here