ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं वारंवार आवाहन केले जाते मात्र तरीही काही अतिउत्साही तरुण ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करत असतात.अशाच एका अतिउत्साही तरुणाला झालेल्या रेल्वे अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दादरला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एक तरुण गाडीतून खाली पडला . यावेळी गाडीची गतीही जास्त होती. आज साधारण ९.३० वाजता कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.







