औरंगाबादचा तरुण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत

Aurangabad's-young-man-in-the-race-for-the-presidency

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : शहरातील सामाजिक कार्यकर्ता विशाल उद्धव नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

या तरुणाची राष्ट्रपतीपदाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार अर्ज भरत असल्याची माहिती या तरुणाने समाजमाध्यमावर दिली. यानंतर समाज माध्यमावर या तरुणाच्या राष्ट्रपती निवडणूक अर्जाची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

विशाल नांदरकर असं राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. तो औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील रहिवासी आहे. तो सामाजिक कामात सक्रीय असतो. मात्र, २५ जून रोजी त्याने दिल्ली गाठत राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर या तरुणाची समाज माध्यमावर चर्चा रंगली असून, त्याची निवडणूक अर्ज भरल्याची पावती व्हायरल झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here