ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : किराणा, मेडिकल, इतर किंमती सामानांच्या दुकानांमध्ये चोऱ्या झाल्याचे ऐकिवात होते. मात्र आता कल्याणमध्ये चोरट्यांनीनी एका चप्पल दुकानावर डल्ला मारला आहे. या दुकानातील १७ हजार रुपये किमतीच्या किमती चपला, बुटांचे जोड चोरून नेले.
अंबरनाथमध्ये राहणाऱ्या कमल रंगलाल मंद्राई (५०) यांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील जलकुंभाजवळ चप्पल विक्रीचे दुकान आहे. सकाळी नऊ वाजता दुकान उघडून रात्री १० वाजता ते दुकान उघडतात. नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले.
दुसऱ्या दिवशी ते सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा त्यांना दुकानाचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार तुटले असल्याचे दिसले. कुलुप जागेवर नव्हते. दुकानात चोरी झाली असण्याचा संशय त्यांना आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे







