जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार तसेच गरिब व होतकरू ४ थी ते १० वी विद्यार्थीना शालेय साहित्य व वह्या मोफत वाटप दिनांक ३/७/२०२२ वार रविवार रोजी सकाळी १०.१० मिनिटांनी क्षेत्रीय मराठा समाज कार्यालय शिवाजी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अॕड रविंद्रभैय्या पाटील,जे.डी.सी.सी.बँक चेअरमन गुलाबाराव देवकर,माजी आमदार गुरूमुख जगवाणी,माजी.जे.डी.सी.सी.चेअरमन सौ.रोहीणीताई खेवलकर, महानगर जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमास सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हाउपाध्यक्ष महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भगवान सोनवणे यांनी केले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार







