अजमेर दर्ग्याचे खादीम सलमान चिश्ती यांना अटक

salman-chisti

अजमेर (राजस्थान) : अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात भडकावणारे भाषण दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर चिश्तींवर जोरदार टीका होत होती.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक विकास सांगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान चिश्ती यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. चिश्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होता आहे. ज्यात नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला स्वत:चे घर देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.खादिम सलमान चिश्ती याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तसाच आहे जसा उदयपूर येथील कन्हैयालालची हत्या करणारे रियाज मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांनी केला होता. २ मिनिट ५० सेंकदाच्या या व्हिडिओत चिश्ती यांनी स्वत:च्या धार्मिक भावनांचा हवाला देत नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची धमकी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here